मी स्वत: फिरलेल्या किल्ल्यांबद्दल थोडेफार लिहीण्याचा प्रयत्न....
गड कोट किल्ले.. पहावे ते सह्याद्रीचे
आचरणात आणु पहावे... ते कर्म थोर शिवरायांचे....
--श्रीकांत लव्हटे
Showing posts with label trek. Show all posts
Showing posts with label trek. Show all posts
Thursday, October 20, 2011
|| ५ परगणे आणि १२ मावळं ||
संदर्भ : जेधे शकावली - करीना
शिवकाळातील ५ परगणे....
१. पुणे
२. चाकण
३. इंद्रापुर
४. सुपे
५. शिरवळ
शिवकाळातील १२ मावंळ आणि किल्ले
१. नाणे मावळ
२. पवन मावळ (कठिणगड उर्फ तुंग, वितंडगड उर्फ तिकोना)
३. पौंड खोरे
४. मुठे खोरे
५. मोसे खोरे
६. कानंद खोरे (प्रचंडगड उर्फ तोरणा)
७. गुंजण मावळ (राजगड)
८. वेळवंड खोरे
९. हिरडस मावळ
१०. रोहिड खोरे (रोहिडा)
११. खडेबारे
१२. कर्यात मावळ (सिंहगड)
--आधिक माहीती किंवा दुरुस्ती अभिप्रायात सुचवावी
Labels:
fort,
fort tikona,
fort torna,
forts,
maval,
shivaji,
Tikona,
Tornagad,
tornagadh,
trek,
trekking destinations,
treks
Monday, November 8, 2010
|| किल्ले कोरीगड उर्फ कोराईगड ||
माहीती :
लोणावळा आणि पालीला जोडणा-या साव घाटाजवळ वसला आहे किल्ले कोरीगड!! आंबवणे आणि पेठ शहापुर ही पायथ्याची गावं, पैकी आंबवणेकडची वाट आता ट्रेकर्ससाठी बंदच... आंबवण्याकडुन वर जाणारी वाट जरा अवघडच! पण सध्या झालेल्या Ambey Vally प्रकल्पाने आंबवणे परीसर आपल्या ताब्यात घेतलाय आणि तेथे खाजगी मालमत्ता म्हणून परवानगीशीवाय जाता येत नाही L मग राहता राहीली पेठ शहापुरने वर जाणारी वाट. वाट एकदम सोपी! नवीन ट्रेकर्ससाठी उत्तम. थोडे टेकडीवजा जंगल तुडवले की दगडी पाय-या (अलीकडे घडवलेल्या) लागतात. त्या अगदी थेट दरवाज्यात नेऊन सोडतात.
किल्लाचे वैशिष्ट म्हणजे अखंड तटबंदी!! अगदी दुरुनही स्पष्ट दिसणारी ती रेघच ओळख पटवुन देते कोरीची… ९५० मीटर उंची.... चढाई सुरु केली की थोड्याच वेळात उजव्या हाताला दोन खोल्यांची गुहा आणि गणेशमंदीर लागते. अजुन थोडे पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजुस पहारेक-यांच्या गुहा आहेत. डाव्या बाजुची मोठी आणि रस्त्याला चिटकुन आहे तर उजव्या बाजुची खुपच छोटी आणि आडवळणी आहे.
सुमारे अर्धा-पाउण तासात आपण दरवाज्यात पोहोचतो... लढाऊ गणेश दरवाजा... दरवाज्यावर शुभपुष्प आहे, सुस्थीतीत. दरवाज्यातुन आत गेल्यावर डाव्या बाजुच्या तटबंदीने गड फिरायला सुरवात करावी. गडमाथा फारच मोठा... विर्स्तीण पतरलेला मोठ्या पाठारासारखा सलग आणि सपाट.... गडावर एकुण ६ तोफा पैका लक्ष्मी तोफ सर्वात मोठी. एका ठिकाणी तटाच्या खाली मोठ्या भिंतींचे अवशेष आहेत. बहुतेक दरवाजा वा मोर्चा असावा.
तिथुन पुढे लागते लक्ष्मी तोफ! तिला व्यवस्थीत लोखंडी तुळ्यांवर ठेवली आहे. बाकी तोफा अशाच गडमाथ्यावर पहुडल्या आहेत. लक्ष्मी तोफेखालीच आहे दुसरा दरवाजा (नाव ज्ञात नाही ). तोफेखाली तट उतरुन दरवाज्यापर्यत जाता येते. दरवाज्यातुन गडाखाली जायला पायवाट नाही. दगडे नी जंगलाने तो भाग व्यापलाय.
माथ्यावर २ मोठी तळी आहेत. बेडकांनी भरलेली J आणि बाजुलाच कोराईदेवीचे मंदीर
मंदीरापुढे दगडी दीपमाळ आहे. मंदीर आता छान बांधुन काढल्याने त्याच्या आवारात निवांत बसता येते. कोराईबद्दल असे वाचलय की मुंबईच्या मुंबादेवीचे दागीने हे कोराईचे आहेत. गडाच्या पश्चीम कड्याला छोटेखानी गुहा आहेत. तिथेच जवळच एक विष्णुची मुर्ती आहे (मी पाहीली नाही L).
इतिहास :
याला कुवांरगड सुध्दा म्हणतात. १६५७ मध्ये लोणावळा भागातील लोहगड, विसापुर, तुंग, तिकोना सवे हा किल्ला स्वराज्यात आला. १८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी किल्ले तोडण्यास सुरवात केली तेव्हा कर्नल प्रॉथरने या गडावर तोफा लावल्या. अखेर १४ मार्च १८१८ ला एक गोळा रोरावत दारुखान्यावर पडला आणि मराठ्यांनी किल्ला सोडला. तेव्हा कोराईदेवीचे दागीने काढुन मुंबई पाठवण्यात आले. हेच दागीने आजही मुंबईच्या मुंबादेवीवर आहेत.
भौगालीक स्थान:
18°37'6.00"N 73°23'10.83"E
कोरीगडच्या वाटेवर:
मुबंई अथवा पुण्याहुन लोणावळ्याला यायचे. तिथुन पेठ शहापुर आहे अवघे २५ किमी. स्थानिक वाहनाने जाता येते. स्वत:ते वाहन असल्यास लोणावळ्यातुन INS Shivaji संस्थेच्या रस्ताने पुढे निघायचे. तिथुन पुढे ambey vally च्या दिशेला पेठ शहापुर गाठता येते.
कोरीगड छायाचित्रे :
Saturday, September 25, 2010
|| किल्ले तोरणागड ||
तोरणा !! खरेतर महाराष्ट्राच्या मातीत वाढणा-या कोणालाही शिवाजीराजे आणि तोरणा याबाबत सांगण्याची गरजच नाही..कारण श्वासागणिक इथले डोंगरमाथे, घाटवाटा, नद्या, अवघे आभाळ, इथला कण नि कण त्याला इतिहास सांगत असतो... याच इतिहासाचे, याच स्वराज्याचे, याच श्रींच्या इच्छेचे वाजतगाजत पहीले तोरण मिरवले ते तोरणागडाने...!!
पुणे जिल्हातील सर्वात उंच किल्ला ४६०६ फूट!!
इतिहास :
१६४७ मध्ये शिवरायांनी तोरणा स्वराज्यात आणला. त्याच्या प्रचंड पसरलेल्या विस्तारामुळे त्याचे नाव "प्रचंडगड" ठेवण्यात आले. नंतर तोरण्याच्या दुरुस्तीमध्ये खणताना २२ हंडे भरुन सोन्याच्या मोहरा सापडल्या. त्या जागीच तोरणाईची स्थापना करण्यात आली. हेच धन वापरुन समोरच्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर पहीली राजधानी "किल्ले राजगड" आकारास आली! नंतर १७०४ मध्ये महाराजांच्या पश्चात अमानुल्लाखानाने (मुघल) तोरणा जिेकला. James douglus wrote about Torna fort : It was Shivajee's first conquest, the nucleus around which all the other clustered making it virtually the cradle of Maratha Empire, which shocked the throne of the great Mogal. it has seen many bloody battles. if Sinhgad is Lion's den then Torna is Eagle's nest!!
भौगालीक स्थान:
18.267989North,73.613591East


तोरण्याच्या वाटेवर:
पुण्याहुन वेल्हा एस् टी पकडुन तोरण्याला जाऊ शकतो. वेल्हावरुन कोठी-बिनी दरवाज्या
ने गडावर जाता येते.
पुणे केळद एस् टीने भट्टी गावात उतरुन मग बुधला माचीला चढता येते. राजगड-तोरणा असा ५-६ तांसांचा टेक करता येतो..
गडावर हे चुकवु नका:
बिनी दरवाजा, कोठी दरवाजा, कोकण दरवाजा, चिणला दरवाजा, चित्त दरवाजा
मेंगाईदेवी मंदीर, तोरणाई मंदीर
बुधला माची, झुंजार माची
तोरणा छायाचित्रे :
Labels:
fort torna,
prachandgad,
sahnyadri,
Tornagad,
tornagadh,
trek
Wednesday, September 22, 2010
|| किल्ले वितंडगड उर्फ तिकोना ||

पवन मावळात वसलेली तुंग-तिकोना ही जोडगोळी! पवना तळ्याचे जणु काही दोन बाजुला रक्षण करायला उभे ठाकलेले दोन कातळी खांबंच....त्यातला तिकोना म्हणजेच वितंडगड !!
लोणावळा परीसरात ४ किल्ल्यांची मोतीमाळ... लोहगड, कठीणगड (तुंग), वितंडगड (तिकोना) आणि विसापुरचा किल्ला...त्यातला तिकोना म्हणजे पाचूसारखा तिन्ही वाजुने तासुन काढलेला... नावाप्रमाणेच त्रिकाणी अगदी इजिप्तच्या पिरॅमिडसारखा....
साधारण ३५०० फूट समुद्रसपाटीपासुन उंची... पायथ्याशी तिकोना पेठ वसलेली...नवीन Trekkers साठी उत्तम...
इतिहास :
स्वराज्यात येण्यापुर्वी तिकोना निजामशाहीत होता. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी निजामाविरुध्दच्या कोकणस्वारीत लोहगड, माहुली, विसापुरचा किल्ला, कर्नाळा सोबत
तिकोना जिेकला.. १६६५ मध्ये पुरंदरच्या तहामध्ये तिकोना देण्यात आला नि किल्ल्यावर मोगलाई आली... कालांतराने पुरंदरच्या तहीतल्या इतर किल्ल्याप्रमाणे तिकोनाही मराठ्यांनी स्वराज्यात आणला !!
भौगालीक स्थान:
18.631677North ,73.512794East


तिकान्याच्या वाटेवर :
मुंबई-पुणे दु्तगती मार्गावर कामशेतला पोहोचायचे. मुबंईवरुन ११० किमी व पुण्याहुन ८५ किमी ... कामशेतवरुन तिकोना अवघा ८ किमी...कामशेतला कामशेत-पवनानगर रोडला वळाचये... मग थेट पवना तळ्याच्या बाजुने मस्त वळणदार रस्तावर गाडी फिरवत तिकोना पायथा !!
बसने कामशेत - काळे कॉलनी - तिकोना पेठ असा प्रवासही करता येतो..
तिकोना छायाचित्रे :
Disover Mahrastra Tikona Episode : http://www.youtube.com/watch?v=ZVFZf_nyfbA
Labels:
fort tikona,
sahyadri,
Tikona,
trek,
vitandgad,
vitandgadh
Subscribe to:
Posts (Atom)
