गड कोट किल्ले.. पहावे ते सह्याद्रीचे
आचरणात आणु पहावे... ते कर्म थोर शिवरायांचे....
--श्रीकांत लव्हटे

Showing posts with label fort tikona. Show all posts
Showing posts with label fort tikona. Show all posts

Thursday, October 20, 2011

|| ५ परगणे आणि १२ मावळं ||


संदर्भ : जेधे शकावली - करीना

शिवकाळातील ५ परगणे....
१. पुणे
२. चाकण
३. इंद्रापुर
४. सुपे
५. शिरवळ

शिवकाळातील १२ मावंळ आणि किल्ले
१.   नाणे मावळ
२.   पवन मावळ (कठिणगड उर्फ तुंग, वितंडगड उर्फ तिकोना)
३.   पौंड खोरे
४.   मुठे खोरे
५.   मोसे खोरे
६.   कानंद खोरे (प्रचंडगड उर्फ तोरणा)
७.   गुंजण मावळ (राजगड)
८.   वेळवंड खोरे
९.   हिरडस मावळ
१०. रोहिड खोरे (रोहिडा)
११. खडेबारे
१२. कर्यात मावळ (सिंहगड)


--आधिक माहीती किंवा दुरुस्ती अभिप्रायात सुचवावी

Wednesday, September 22, 2010

|| किल्ले वितंडगड उर्फ तिकोना ||









माहीती :


पवन मावळात वसलेली तुंग-तिकोना ही जोडगोळी! पवना तळ्याचे जणु काही दोन बाजुला रक्षण करायला उभे ठाकलेले दोन कातळी खांबंच....त्यातला तिकोना म्हणजेच वितंडगड !!
लोणावळा परीसरात ४ किल्ल्यांची मोतीमाळ... लोहगड, कठीणगड (तुंग), वितंडगड (तिकोना) आणि विसापुरचा किल्ला...त्यातला तिकोना म्हणजे पाचूसारखा तिन्ही वाजुने तासुन काढलेला... नावाप्रमाणेच त्रिकाणी अगदी इजिप्तच्या पिरॅमिडसारखा....
साधारण ३५०० फूट समुद्रसपाटीपासुन उंची... पायथ्याशी तिकोना पेठ वसलेली...नवीन Trekkers साठी उत्तम...


इतिहास :

स्वराज्यात येण्यापुर्वी तिकोना निजामशाहीत होता. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी निजामाविरुध्दच्या कोकणस्वारीत लोहगड, माहुली, विसापुरचा किल्ला, कर्नाळा सोबत
तिकोना जिेकला.. १६६५ मध्ये पुरंदरच्या तहामध्ये तिकोना देण्यात आला नि किल्ल्यावर मोगलाई आली... कालांतराने पुरंदरच्या तहीतल्या इतर किल्ल्याप्रमाणे तिकोनाही मराठ्यांनी स्वराज्यात आणला !!


भौगालीक स्थान:

18.631677North ,73.512794East




तिकान्याच्या वाटेवर :

मुंबई-पुणे दु्तगती मार्गावर कामशेतला पोहोचायचे. मुबंईवरुन ११० किमी व पुण्याहुन ८५ किमी ... कामशेतवरुन तिकोना अवघा ८ किमी...कामशेतला कामशेत-पवनानगर रोडला वळाचये... मग थेट पवना तळ्याच्या बाजुने मस्त वळणदार रस्तावर गाडी फिरवत तिकोना पायथा !!
बसने कामशेत - काळे कॉलनी - तिकोना पेठ असा प्रवासही करता येतो..


तिकोना छायाचित्रे :


Disover Mahrastra Tikona Episode : http://www.youtube.com/watch?v=ZVFZf_nyfbA


Locations of visitors to this page