गड कोट किल्ले.. पहावे ते सह्याद्रीचे
आचरणात आणु पहावे... ते कर्म थोर शिवरायांचे....
--श्रीकांत लव्हटे

Monday, November 8, 2010

|| किल्ले कोरीगड उर्फ कोराईगड ||
माहीती :

लोणावळा आणि पालीला जोडणा-या साव घाटाजवळ वसला आहे किल्ले कोरीगड!! आंबवणे आणि पेठ शहापुर ही पायथ्याची गावं, पैकी आंबवणेकडची वाट आता ट्रेकर्ससाठी बंदच... आंबवण्याकडुन वर जाणारी वाट जरा अवघडच! पण सध्या झालेल्या Ambey Vally प्रकल्पाने आंबवणे परीसर आपल्या ताब्यात घेतलाय आणि तेथे खाजगी मालमत्ता म्हणून परवानगीशीवाय जाता येत नाही L मग राहता राहीली पेठ शहापुरने वर जाणारी  वाट. वाट एकदम सोपी! नवीन ट्रेकर्ससाठी उत्तम. थोडे टेकडीवजा जंगल तुडवले की दगडी पाय-या (अलीकडे घडवलेल्या) लागतात. त्या अगदी थेट दरवाज्यात नेऊन सोडतात.

किल्लाचे वैशिष्ट म्हणजे अखंड तटबंदी!!  अगदी दुरुनही स्पष्ट दिसणारी ती रेघच ओळख पटवुन देते कोरीची ९५० मीटर उंची.... चढाई सुरु केली की थोड्याच वेळात उजव्या हाताला दोन खोल्यांची गुहा आणि गणेशमंदीर लागते.  अजुन थोडे पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजुस पहारेक-यांच्या गुहा आहेत. डाव्या बाजुची मोठी आणि रस्त्याला चिटकुन आहे तर उजव्या बाजुची खुपच छोटी आणि आडवळणी आहे.

सुमारे अर्धा-पाउण तासात आपण दरवाज्यात पोहोचतो... लढाऊ गणेश दरवाजा... दरवाज्यावर शुभपुष्प आहे, सुस्थीतीत. दरवाज्यातुन आत गेल्यावर डाव्या बाजुच्या तटबंदीने गड फिरायला सुरवात करावी. गडमाथा फारच मोठा... विर्स्तीण पतरलेला मोठ्या पाठारासारखा सलग आणि सपाट.... गडावर एकुण ६ तोफा पैका लक्ष्मी तोफ सर्वात मोठी. एका ठिकाणी तटाच्या खाली मोठ्या भिंतींचे अवशेष आहेत. बहुतेक दरवाजा वा मोर्चा असावा.

   

तिथुन पुढे लागते लक्ष्मी तोफ! तिला व्यवस्थीत लोखंडी तुळ्यांवर ठेवली आहे. बाकी तोफा अशाच गडमाथ्यावर पहुडल्या आहेत. लक्ष्मी तोफेखालीच आहे दुसरा दरवाजा (नाव ज्ञात नाही ). तोफेखाली तट उतरुन दरवाज्यापर्यत जाता येते. दरवाज्यातुन गडाखाली जायला पायवाट नाही. दगडे नी जंगलाने तो भाग व्यापलाय.

माथ्यावर २ मोठी तळी आहेत. बेडकांनी भरलेली J आणि बाजुलाच कोराईदेवीचे मंदीरमंदीरापुढे दगडी दीपमाळ आहे. मंदीर आता छान बांधुन काढल्याने त्याच्या आवारात निवांत बसता येते. कोराईबद्दल असे वाचलय की मुंबईच्या मुंबादेवीचे दागीने हे कोराईचे आहेत. गडाच्या पश्चीम कड्याला छोटेखानी गुहा आहेत. तिथेच जवळच एक विष्णुची मुर्ती आहे (मी पाहीली नाही L).

इतिहास :

याला कुवांरगड सुध्दा म्हणतात. १६५७ मध्ये लोणावळा भागातील लोहगड, विसापुर, तुंग, तिकोना सवे हा किल्ला स्वराज्यात आला. १८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी किल्ले तोडण्यास सुरवात केली तेव्हा कर्नल प्रॉथरने या गडावर तोफा लावल्या. अखेर १४ मार्च १८१८ ला एक गोळा रोरावत दारुखान्यावर पडला आणि मराठ्यांनी किल्ला सोडला. तेव्हा कोराईदेवीचे दागीने काढुन मुंबई पाठवण्यात आले. हेच दागीने आजही मुंबईच्या मुंबादेवीवर आहेत.


भौगालीक स्थान:

 18°37'6.00"N  73°23'10.83"E

कोरीगडच्या वाटेवर:
मुबंई अथवा पुण्याहुन लोणावळ्याला यायचे. तिथुन पेठ शहापुर आहे अवघे २५ किमी. स्थानिक वाहनाने जाता येते. स्वत:ते वाहन असल्यास लोणावळ्यातुन INS Shivaji संस्थेच्या रस्ताने पुढे निघायचे. तिथुन पुढे ambey vally च्या दिशेला पेठ शहापुर गाठता येते.

कोरीगड छायाचित्रे :No comments:

Post a Comment

Locations of visitors to this page